Marathwada Express : मराठवाडा एक्सप्रेसमधील विद्यार्थ्यांच्या जीवाची घालमेल, प्रवासी संतप्त; अधिका-यांवर कारवाई हाेणार?

रेल्वे इंजिन कोणत्या कारणाने बंद झाले. इंजन अधिकाऱ्यांनी तपासले का नाही याची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
marathwada express engine issue train late
marathwada express engine issue train latesaam tv
Published On

Parbhani News :

परभणी धर्माबादकडून मनमाडकडे जाणाऱ्या मराठवाडा एक्सप्रेसचे पूर्णा स्टेशनच्या बॉम्बे पूल नजीत रेल्वे गाडीचे आज (साेमवार) सकाळच्या सुमारास इंजिन फेल झाले. इंजिन फेल झाल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. या गाडीत बहुतांश प्रवासी हे विद्यार्थी हाेते. त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठवाडा एक्सप्रेसने आज अनेक विद्यार्थी प्रवास करीत हाेते. या विद्यार्थ्यांची आज (साेमवार) परीक्षा आहे. एक्सप्रेसचे इंजन फेल झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाची घालमेल झाले. आपल्याला परीक्षेला वेळेत पाेहचायचे आहे अन् हे काय घडून बसले अशी भावना ते व्यक्त करु लागले.

marathwada express engine issue train late
Nagar : नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रेल्वे चालक व लोको पायलट यांच्या अथक परिश्रमानंतर रेल्वे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. मराठवाडा एक्सप्रेसचा पूर्णा येथून निघण्याची वेळ सहा वाजता आहे.  (Maharashtra News)

ही गाडी दोन ते अडीच तासानंतर सोडण्यात आली. रेल्वे इंजिन कोणत्या कारणाने बंद झाले व ते इंजन अधिकाऱ्यांनी तपासले का नाही याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

marathwada express engine issue train late
Bharat Bandh News : 16 फेब्रुवारीला औद्योगिकसह ग्रामीण भारत बंदची हाक : आडम मास्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com