BAMU NEWS: प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ३३ महाविद्यालये अपात्र! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी कारवाई

BAMU NEWS: प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ३३ महाविद्यालये अपात्र! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी कारवाई
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada UniversitySAAM TV

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ३३ महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरविण्याचा मोठा निर्णय घेतलाय. बीएड, बीपीएड आणि विधी शाखेतील महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य, पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या महाविद्यालांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने गेल्या आठवड्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या चार महाविद्यालयांची येत्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाशी संलग्नित बीएड , बीपीएड, एमएड, एमपीएड, एलएलबी व एलएल एम अभ्यासक्रमाच्या ३३ महाविद्यालयांना नाहरकत प्रमाणपत्र (नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) नाकारले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकातील विजय काँग्रेससाठी नवसंजीवनी, पण ही लाट थोपवावी लागेल!

राज्य शासनाच्या सीईटी सेलतर्फे या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महाविद्यालयांना राज्य शासनाकडे नाहरकत प्रमाणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख १२ मे ही होती. या महाविद्यालयात पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव होता. तसेच पूर्णवेळ प्राचार्य तसेच व प्राध्यापकांच्या नियुक्तयाही महाविद्यालयाने केल्या नव्हत्या. (Breaking News)

नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षक भरती करावी असे विद्यापीठ प्रशासनाने वारंवार बजावले होते. गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर मोठी कारवाईचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. या निर्णयामुळे आता ६१ पैकी २८ महाविद्यालयेच प्रथम वर्षाचे प्रवेश आपल्या महाविद्यालयात देऊ शकणार आहेत. (Latest Political News)

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
CM Eknath Shinde In Satara : 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना'; Karnataka च्या निकालावरुन एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टाेला (पाहा व्हिडिओ)

बीड जिल्हयात सर्वाधिक कॉलेज अपात्र

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे असून शहरी व ग्रामीण भागात मिळून बीएड , बीपीएड व विधी या शाखेंतर्गत ६१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक २७ महाविद्यालये असून बीड १७, जालना ६ तर उस्मानाबाद जिल्हयात ११ संलग्नित महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ २८ महाविद्यालयेच यंदा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ शकणार आहेत . तर अपात्र ठरविण्यात आलेल्या महाविद्यालयांची संख्या ३३ असून बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ११ महाविद्यालयांचा यात समावेश आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com