
Satara News : स्वत:चे घर जळत आहे त्याकडे लक्ष द्या, ते वाचवा. दुस-याचे घर जळत असताना कसला आनंद व्यक्त करीत आहात असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी करीत बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असा टाेला मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे नाव न घेतला लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळे दिवाने झालेत असेही शिंदेंनी म्हटलं. ते सातारा (satara) जिल्ह्यातील पाटण (patan) तालुक्यातील दाैलतनगर येथे बाेलत हाेते. (Maharashtra News)
सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज (शनिवार ता.१३) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते. व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजीबापू पाटील , आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje Bhosale) यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे सरकार तुमचं सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे. जनसामान्यांना मुख्यमंत्री भेटतात असे जेव्हा ज्येष्ठ नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते. आमचा दसूरा काही अजेंडा नाही. आम्हांला लाेकांची कामे करायची आहेत. आम्ही लाेकांशी संवाद साधताे. शासन आपल्या दारी या माध्यमातून शासन आणखी काही देता येईल का याचा विचार आम्ही करीत आहाेत.
दरम्यान शहाजीबापू यांच्या भाषणाचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटक राज्यातील निवडणुकांच्या निकालावर काही जण आनंद व्यक्त करीत आहेत. जनतेने अडीच वर्षाचे सरकार पाहिले आहे आणि आत्ताचे दहा महिन्यांचे सरकार पाहिले आहे. काय फरक आहे ना असे शिंदे यांनी उपस्थितांना विचारले.
(Satara) पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. पाटण तालुक्यातील किमान 20 ते 25 हजार पात्र लाभार्थ्यांना एकाच दिवशी विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे असेही देसाईंनी नमूद केले. सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.