- अमर घटारे
Yashomati Thakur News : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची कर्नाटकात जादू चालली नाही असा टाेला काॅंग्रेस आमदार यशाेमती ठाकूर (yashomati thakur) यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे. भाजपने राहुल गांधी (rahul gandhi) यांच्यावर अन्याय केला. त्यांची खासदारकी हिसकावून घेतली. परंतु राहुल जी यांनी गावागावात जाऊन भारत जोडो यात्रा काढली. त्याचे फलित आलेलं दिसत आहे अशी भावना आमदार ठाकूर यांनी कर्नाटकातील निवडणुकीत (Karnataka Assembly Election Result 2023) काॅंग्रेसला मिळालेल्या भरघाेस यशानंतर साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)
संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक राज्याचे विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (शनिवार) लागला. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह, काॅंग्रेसची प्रतिष्ठापणाला लागली हाेती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील त्यांचे नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले. एका मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपच्या उमेदवाराला चांगली टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे.
दुपारी एक वाजेपर्यंत काॅंग्रेसने चार जागांवर विजय मिळविला हाेता तर भाजपने एका जागेवर तसेच काॅंग्रेस 129 आणि भाजप 64 जागांवर आघाडीवर राहिली. काॅंग्रेसच्या यशाचे गमक आमदार यशोमती ठाकूर यांनी राहूल गांधी यांचे असल्याचे म्हटलं.
आमदार ठाकूर म्हणाल्या आता सगळं सत्य बाहेर येत आहे. भाजपने जो जाती भेद वाढवला तो जनतेला आवडला नाही. लोकसभेच्या तोंडावर जे निकाल समोर येत आहे, त्याचा अर्थ पूर्ण देश याच प्रकारे कौल देणार असेही ठाकूर यांनी नमूद केले.
ये तो झांकी है पिक्चर अभी बाकी है...असा इशाराच आमदार यशाेमती ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षाला कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.