Karnataka VidhanSabha Election Result 2023 : कर्नाटकात राष्ट्रवादी काॅंग्रेसची एंट्री ? 9 पैकी इतक्या मतदारसंघात आघाडी

यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रेससह राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील भाजप पुढं आव्हान निर्माण केले आहे.
Karnataka Assembly Election Result,  NCP, Nipani
Karnataka Assembly Election Result, NCP, NipaniSaam tv
Published On

Karnataka VidhanSabha Election Result : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानूसार एका मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. अन्य मतदारसंघात पक्षास म्हणावे तेवढे यश आलेले नाही. (Maharashtra News)

Karnataka Assembly Election Result,  NCP, Nipani
Narayan Rane News : जागेची अडचण? उद्योजकांसाठी नारायण राणेंची साता-यात माेठी घोषणा; उदयनराजेंनी केलं स्वागत

गोवा, मेघालय आणि मणिपूर यांसारख्या राज्यांमधील राजकीय भवितव्यामुळे एनसीपीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवा यासाठी कर्नाटकात उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. कर्नाटकातील निवडणुकीच्या रिंगणात पक्षाचा प्रवेश अशा वेळी झाला आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची माेट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील पक्षाच्या उमेदवारांच्या मतांकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Karnataka Assembly Election Result,  NCP, Nipani
Devendra Fadnavis News : शेतक-यांना दिलासा ! पीक कर्जासाठी Cibil Score मागणा-या बँकांवर गुन्हा दाखल हाेणार (पाहा व्हिडिओ)

या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघातून (nipani constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील (Uttam Patil) देवर हिप्परगीमधून मसूरसाहेब बिलगी, जमीर अहमद इनामदार (बसवान बागेवाडी), कुलप्पा चव्हाण (नागठाण), R हरी (येलबुर्गा), R शंकर (राणेबेन्नूर), K सुगुणा (हंगरी बोम्मनहल्ली) SYM मसूद फौजदार (विराजपेठ) आणि रेहाना बानो (नरसिंहराजा) हे नऊ उमेदवार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आपलं नशीब अजमावत आहेत.

Karnataka Assembly Election Result,  NCP, Nipani
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : 'राजाराम' च्या अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण

राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांपैकी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदार संघातून उत्तम पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा सुमारे 1333 मतांनी आघाडीवर गेले. या मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्ले आणि कॉंग्रेसचे काकासाहेब पाटील हे देखील लढत देत आहेत.

दरम्यान उत्तम पाटील यांची ही आघाडी माेडीत काढत भाजपच्या शशिकला यांनी (सकाळी 11.25 वाजता) 966 मतांची आघाडी घेत पाटील गटास धक्का दिला. परंतु ही मतांची आघाडी फार टिकली नाही. पुन्हा पाटील यांनी 1272 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात एनसीपीला विजयाच्या आशा आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com