Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : जिल्‍हा उद्योग केंद्रात लाच स्वीकारताना महिलेला अटक

Jalgaon News : महिलेने म्हशी विकत घेण्याकरिता कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केला होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेत जमीनीवर दुग्ध व्यवसायात कर्ज मंजुर करण्यासाठी दहा हजाराची (Bribe) लाच घेतांना जिल्हा उद्योग (Jalgaon) केंद्रातील एका महिलेला अटक करण्यात आली. विद्या रमेश शहा असे या महिलेचे नाव आहे. (Live Marathi News)

मौजे पुरी (ता. रावेर) येथील तक्रारदार असलेल्या महिलेने म्हशी विकत घेण्याकरिता कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केला होता. यावेळी केंद्रात उपस्थित विद्या परेश शाह यांनी तक्रारदार यांना जळगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून कर्ज मंजुरीसाठी आधिकाऱ्यांना ३० हजार लाचेची मागणी केली. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान तक्रारदाराने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB) तक्रार केली. याबाबत पडताळणी करून उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पथकाने जिल्‍हा उद्योग केंद्रा जवळ सापळा रचला. तक्रादारांकडून पैसे घेताच, येथे असलेल्या पथकाने विद्या शहा यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT