Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

Jalgaon Crime News : दारूच्या नशेत ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुकलीवर अत्याचार

Jalgaon News ; निंभोरा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
Published on

जळगाव : दारू पिऊन नशेत असलेल्या एका ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना रावेर (Raver) तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. (Live Marathi News)

Jalgaon Crime News
Bribe Trap : निधी मंजूर झाल्याने मागितले लाखाचे बक्षिस; लाच स्वीकारताना ऑपरेटर ताब्यात, ग्रामसेवक पसार

रावेर तालुक्यातील एका गावातील पीडित चिमुरडी हि तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान १८ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणीही नसताना संशयित वामन बळिराम घटे (वय ६५) याने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक (Crime News) अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा (Jalgaon) गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. घडला प्रकार मुलीने घरात सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime News
Yawal News : ट्रकचा दोर बांधताना तुटली आयुष्याची दोर; खाली पडल्याने चालकाचा मृत्यू

संशयितास अटक 

या प्रकरणी निंभोरा पोलिस (Police) ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com