Bribe Trap : निधी मंजूर झाल्याने मागितले लाखाचे बक्षिस; लाच स्वीकारताना ऑपरेटर ताब्यात, ग्रामसेवक पसार

Jalgaon News : शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.
Bribe Trap
Bribe TrapSaam tv
Published On

यावल (जळगाव) : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्याने बक्षीस म्हणून एक लाख रुपयांची लाच ग्रामसेवकाने (Jalgaon) सांगितल्यानुसार घेताना चुंचाळे ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटरला जळगाव एसीबीने (Jalgaon ACB) अटक केली. मात्र ग्रामसेवक फरार झाला आहे. (Maharashtra News)

Bribe Trap
Pandharpur News : पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना जेवणाचीही सुविधा

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार चुंचाळे (ता. यावल) गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था आहे. त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी (Bribe) मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल ५० टक्के बक्षीस म्हणून एक लाखाची लाच ग्रामसेवक (Gram Sevak) हेमंत जोशी यांनी १६ फेब्रुवारीला मागितली होती. तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Trap
St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

रंगेहाथ पकडले 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ फेब्रुवारीला सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली, तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकूण लागताच पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com