Pandharpur News : पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना जेवणाचीही सुविधा

Pandharpur News : पंढरपुरात आषाढी, कार्तिकी एकादशीप्रमाणे माघी यात्रेला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. मंगळवारी अर्थात २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपुरात माघी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेला अजून दोन दिवस बाकी असताना यात्रेसाठी (Pandharpur) पंढरपुरात आतापासूनच सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. (Latest Marathi News)

Pandharpur News
Lok Sabha Election: शिंदे गटातील शिवसेनेच्या तीन जागेवर भाजपचा डोळा; दक्षिण मुंबई, रत्नागिरी, पालघर मतदारसंघ भाजपकडे?

पंढरपुरात आषाढी, कार्तिकी एकादशीप्रमाणे (Ashadhi Ekadashi) माघी यात्रेला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. मंगळवारी अर्थात २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून सुमारे चार ते पाच लाख येतील असा अंदाज आहे. (Vitthal Mandir) यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी वारकऱ्यांनी फुलू लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून (Chandrabhaga River) चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Nandurbar News: इंजिनिअरिंग केली अन् शेतकरी झाला, कमवले लाखो रुपये; वाचा तरुणाच्या यशाची कहाणी

दर्शन रांगेतील भाविकांना जेवणाची सुविधा   

पंढरपूरमध्ये आलेले भाविक दर्शन रांगेत लागले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत पोहचली असून. तर दहा पैकी सात पत्रशेड पूर्ण भरले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. याशिवाय यंदा प्रथमच मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com