Maratha Andolan : पंढरपूर शहराकडे येणा-या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

Rasta Roko : पंढरपूर येथील रास्ता राेकाे आंदाेलनामुळे प्रवाशांबरोबरच माघी यात्रेसाठी येणा-या भाविकांची गैरसोय झाली. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
maratha samaj rasta roko andolan in pandharpur
maratha samaj rasta roko andolan in pandharpur saam tv
Published On

Pandharpur News :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ आज (शनिवार) पंढरपूर तालुक्यातील ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

मराठा आंदाेलकांनी पंढरपूर शहराकडे येणा-या प्रमुख मार्गावर सरकारच्या विरोधात घाेषणा देत वाहतूक राेखली. पंढरपूर - पुणे मार्गावर वाखरी येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पुणे आणि सातारा या बाजूला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

maratha samaj rasta roko andolan in pandharpur
Lok Sabha Election 2024 : लाेकसभेची तयारी करा... शरद पवारांचा आदेश येताच देशमुखांनी ठाेकला शड्डू (पाहा व्हिडिओ)

पंढरपूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर गोपाळपूर येथे मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर तिकडे शेगाव दुमाला व परिसरातील मराठा समाजाने पंढरपूर- सोलापूर महामार्ग रोखून धरला. याबराेबरच पंढरपूर - टेंभूर्णी या मार्गावर देखील आंदोलन करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंढरपूर शहराकडे येणा-या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. एकाच वेळी प्रमुख महामार्गावर रास्ता रोको व चक्काचाम आंदोलन केल्यामुळे प्रवाशांबरोबरच माघी यात्रेसाठी येणा-या भाविकांची गैरसोय झाली. या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Edited By : Siddharth Latkar

maratha samaj rasta roko andolan in pandharpur
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com