- चेतन व्यास
वर्धा लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार हर्षवर्धन देशमुख (former mla harshwardhan deshmukh) यांना शरद पवार (ncp leader sharad pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) तयारीला लागण्याचा निराेप दिल्याने देशमुखांनी महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) पदाधिकाऱ्यांशी संवाद चालू केला आहे. देशमुख हे तीनदा आमदार राहिलेले असून दोनदा ते अपक्ष निवडून आले आहेत. यामुळे या मतदारसंघात आता पुन्हा चुरस पहावयास मिळणार आहे. (Maharashtra News)
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ (wardha lok sabha constituency) हा नेहमीच काँग्रेसच्या (congress) वाट्याला येताे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शरद पवार गटाच्या (sharad pawar faction) वाट्याला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर अमरावती लोकसभा मतदारसंघात (amravati lok sabha constituency) काँग्रेसचा उमेदवार असणार अशी चर्चा आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे. यात चार वर्धा जिल्ह्याचे तर दोन अमरावती जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वर्धेची जागा ही शरद पवार गटाला सुटणार असून मोर्शी विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शरद पवार यांचे आदेश मिळताच देशमुख हे सध्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. सोबतच या मतदारसंघाच्या समस्या जाणून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशमुख हे तीनदा आमदार राहिलेले असून दोनदा ते अपक्ष निवडून आले आहे. यामुळे या मतदारसंघात आता पुन्हा चुरस पहावयास मिळणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.