Jalgaon Crime : एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या; साडेचार लाखांचे सोने लंपास

Jalgaon News : घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला. यासोबतच याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी झाल्या आहेत.
Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv
Published On

सावदा (जळगाव) : सावदा शहरासह परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्या. यात एका घरातील (Jalgaon) लॉकरमधील साडेचार लाखांचे सोने (Gold) चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Crime
Parola News : २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू; बारा दिवसांपासून होता बेपत्ता

जळगाव जिल्ह्यातील सावदा शहरातील स्वामीनारायण नगरात चोरट्यांनी भांड्यांचे व्यापारी भागवत कासार यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटात ठेवलेल्या साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास (Crime News) केले. या प्रकरणी कासार यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कासार यांच्या घरातून सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मंगलपट आणि अंगठी, कानातले असा एकूण ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस (Theft) गेला. जळगाव येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime
Abhijit Adsul : नवनीत राणांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट उशीर का करतेय?; अभिजित अडसूळ यांचा सवाल


घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला. यासोबतच याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी झाल्या आहेत. भागवत टिकाराम कोळंबे यांचे स्वामीनारायण नगर येथील घर, तर वैभव बळीराम महाजन यांच्या केळी ग्रुपमध्ये देखील चोरी झाली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com