Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

Konkan Alphonso vs Valsad Alphonso: कोकणचा हापूस चोरण्याचा डाव आता गुजरातनं आखलाय.. गुजरातच्या वलसाडनं हापूसच्या जीआय मानांकनासाठी नेमका काय कट आखलाय? आता हा वाद नेमका कुठे जाणार आहे? त्यावरचा हा रिपोर्ट.
Konkan Hapus Vs Valsad Hapus | Gujarat Gi Tag Dispute
Konkan Hapus Vs Valsad Hapus | Gujarat Gi Tag Disputesaam tv
Published On: 

कोकणचा हापूस म्हणजे राज्याची ओळख..मात्र आता हा हापूस चोरण्याचा डाव गुजरातनं आखलाय..आणि यासाठी निमित्त केलंय जीआय टॅगचं...गुजरातच्या 'वलसाड हापूस'ला स्वतंत्र जीआय टॅग मिळावा यासाठी करण्यात आलेल्या अर्जावरील अंतिम सुनावणी चेन्नईतील जीआय रजिस्ट्रीसमोर पूर्ण झालेली असून त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलाय. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलीय. नेमका वाद काय? पाहूयात.

2018 मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी 'कोकण हापूस'ला पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळालं...

मात्र, 2023 मध्ये गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठानं'वलसाड हापूस' या नावाने स्वतंत्र जीआय मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला.

कोकणचा हापूस पळवण्याचा आणि त्याची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंबा उत्पादकांनी केला

कोकण कृषी विद्यापीठ आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेने या अर्जावर जोरदार आक्षेप नोंदवला.

चेन्नई जीआय रजिस्ट्रीनं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवतं दोन्ही पक्षांनी वादावर सामंजस्याने मार्ग काढावा, अशी सूचना केलीय.

मात्र कोकणातील आंबा उत्पादकांनी हापूस या नावावर तडजोड करणार नसल्याची ठाम भूमिका घेतलीय..तसचं हापूस या नावाच्या चोरीविरोधात रस्त्यावर उतरू असा आक्रमक पवित्राही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय. दरम्यान कोकणच्या हापूसची ओळख कुणीही पुसू शकत नाही..जीआय मानांकनासंदर्भात आम्ही आमची बाजू मांडू, असं आश्वासन मंत्री नितेश राणेंनी दिलयं.

हापूस आंब्याचा मूळ इतिहास, कोकणातील विशिष्ट हवामान, जमीन आणि या फळाशी जोडलेली कोकणची अस्मिता याचे भक्कम पुरावे कोकणच्या बाजूने जीआय रजिस्ट्रीसमोर सादर करण्यात आलेत..त्यामुळे जर निकाल कोकणच्या विरोधात गेला किंवा हापूसच्या नावावर तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, तर हापूस वरून आता महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.