'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Pm Modi Questions Industrialists Over Salary Hikes : नवी दिल्लीत फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योग जगताची चांगलीच कानउघडणी केलीय. 12 लाखांपर्यंतची करसवलत दिली. मात्र तुम्हाला कितीही दिलं तरी तुमची भूक भागत नाही, असा टोला मोदींनी उद्योगपतींना लगावलाय. तसचं कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दलही मोदींनी उदयोगपतींना सुनावलयं.
Pm Modi Questions Industrialists Over Salary Hikes :
Pm Modi Questions Industrialists Over Salary Hikes After Rs 12 Lakh Tax Reliefsaam tv
Published On: 

मात्र पंतप्रधानांच्या या विधानानंतर राहुल गांधीनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा उद्योगपतींबाबतचा आरोप नसून मोदींचा कबुलीजबाब असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. कर कमी केला, तरीही ना पगार वाढवला, ना नोकऱ्या दिल्या. मोदी जी, हा तुमच्यावरचा आरोप नाही. ही तुमची कबुली आहे. तुम्ही म्हणता, उद्योगपतींची भूक इतकी आहे की पोट भरतच नाही. अगदी बरोबर बोललात. ही भूक कोणाची आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. विमानतळे, बंदरे, खाणी, जंगले, वीज, कोळसा, रस्ते हे सगळं ज्यांच्या नावावर केले, त्यांनी किती नोकऱ्या निर्माण केल्या? मोदी जी, लूट तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी केली आहे, हे देशाने पाहिलयं.

दरम्यान मोदींसह भारतीय अर्थव्यवस्थेवर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी भाजपवर चांगलीच टीका केलीय. एकीकडे पंतप्रधान मोदींनी विकासाच्या जबाबदारीत उद्योगपतींनीही मोठा वाटा उचलावा असे आवाहन केलयं. तर दुसरीकडे राहुल गांधींनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे उद्योग जगताला दिलेल्या सवलतींचा परतावा रोजगार आणि पगारवाढीच्या रूपात का मिळाला नाही यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. या वादामुळे देशातील रोजगार, मक्तेदारी आणि लघुउद्योगांच्या भवितव्याचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.