BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

BJP's Ravindra Chavan Targets Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या भारताच्या जागतिक स्थानावरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. २०१४ पूर्वीचा आणि २०१४ नंतरचा भारत दाखवत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
ravindra chavan news
ravindra chavan Saam tv
Published On: 

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि भारताच्या जागतिक स्थानावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधींच्या टीकेला आता भाजपकडून दिलं जात असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २०१४ पूर्वीचा भारत' आणि '२०१४ नंतरचा भारत' यातील फरक दाखवलाय. दोन आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांतील छायाचित्रांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केलीय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केली आहेत. यात २०११ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मागील रांगेत उभे असल्याचा फोटो आहे.

ravindra chavan news
शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

तर दुसरा २०२४ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रभागी व केंद्रस्थानी असल्याचे दिसत आहे. या फोटोंना '२०१४ पूर्वीचा भारत' आणि '२०१४ नंतरचा भारत' अशी शीर्षके देत चव्हाणांनी जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थान उंचावल्याचा दावा केलाय.

ravindra chavan news
राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

'दूध का दूध, पानी का पानी' असे म्हणत रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या विधानांवर निशाणा साधलाय. आपल्या पोस्टमध्ये चव्हाण यांनी म्हटलंय की, "भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झालीय. या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही." असा इशाराच रवींद्र चव्हाण यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.