शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,69,820 शेतकऱ्यांसाठी पहिली OTS लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहन (Incentive) असे तीन घटक आहेत.
Maharashtra farmer loan waiver OTS first beneficiary list 2026
Maharashtra farmer loan waiver OTS first beneficiary list 2026saam tv
Published On: 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आलीय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्ज माफी, एकवेळ समझोता (OTS) व प्रोत्साहन (Incentive) असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आलीय.

एकूण २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रु १८,००० कोटी रक्कमेची कर्जमुक्ती करण्यात आलीय. एकवेळ समझोता घटकांतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या २ लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतरच शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करून १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय.

एकवेळ समझोता (OTS) अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट 'अ' व बँकनिहाय यादी परिशिष्ट 'ब' मध्ये सोबत जोडले आहे. सदर लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.एक वेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही अवलंबली जाणार आहे.

एक वेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची यादी आज दि. १९/११/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलीय. ही यादी गावपातळीवर ग्रामपंचायत तसेच बँकेच्या शाखेत व विकास संस्थेच्या शाखेमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यात कर्जमुक्ती घटकाची अंमलबजावणी करण्यात आली. याअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

Maharashtra farmer loan waiver OTS first beneficiary list 2026
मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

नव्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, 'ओटीएस'नुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम यांचा समावेश आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलीय.

पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील तपासून 'ओटीएस'नुसार त्यांच्या हिश्श्याची २ लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. संबंधित खात्यात 'ओटीएस'नुसार बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra farmer loan waiver OTS first beneficiary list 2026
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! चार अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, कोणाची कुठे झाली बदली?

शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकेकडून पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल. शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम जमा केल्याची खातरजमा झाल्यानंतर थकबाकी अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.