Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : सुट्यांमध्ये मामाच्या घरी आला; खेळता खेळता घरात जात उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : स्वप्नील पाटील हा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. मागील काही दिवसांपासून स्वप्नील हा मामाकडे होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उन्हाळी सुट्या असल्याने मामाच्या घरी आलेल्या मुलाने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (Jalgaon) जळगाव तालुक्यातील कुसुंबा या गावात घडली असून स्वप्नील दीपक पाटील (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. 

बाळद (ता. पाचोरा) येथील असलेला स्वप्नील पाटील हा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. मागील काही दिवसांपासून स्वप्नील हा मामाकडे होता. दरम्यान १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत होती. त्यांच्यासोबत स्वप्नील देखील होता. खेळात असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील रूममध्ये जात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.  

दरम्यान दुपारी एकच्या सुमारास त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचे दार आतून बंद होते. दार उघडत का नाही म्हणून आजीने आरडाओरड केली. यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडला. तेव्हा, स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT