Eknath Khadse News : शेवटपर्यंत राजकीय संन्यास नाही; एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

Jalgaon News : लोकसभेसाठी जळगाव व रावेर मतदार संघात उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

जळगाव : विधान परिषदेचा सदस्य आहे. त्यामुळे हे सदस्यत्व असताना निवडणूक लढणे योग्य होणार नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे, कि (Jalgaon) विधानसभेची निवडणूक लढणार नाही. तसेच खासदारकी परिवारामध्ये असल्यामुळे मी खासदारकीची पण निवडणूक लढणार नाही. मुख्य म्हणजे मी राजकीय संन्यास मरेपर्यंत घेणार नसल्याचे वक्तव्य आमदार (eknath Khadse) एकनाथ खडसे यांनी आज केले आहे. 

Eknath Khadse
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; १०० पोपटांचा मृत्यू, काही पोपट जखमी

लोकसभेसाठी जळगाव व रावेर मतदार संघात उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींना (Narendra modi) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता पडू शकते; अशी बातमी व्हायरल होत आहे. यावर बोलताना खडसे यांनी सांगितले कि, नरेंद्र मोदींची आजची स्थिती ४०५ अशी आहे; यामुळे नरेंद्र मोदी यांना सध्या तरी कुणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. एवढे बहुमत त्यांना या निवडणुकीत मिळेल; असे खडसे यांनी स्पष्ट केले. 

लवकरच भाजप प्रवेश
एकनाथ खडसे यांचा भाजपमधील (BJP) प्रवेश लांबला आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि भाजप प्रवेशाबाबत कुणाची नाराजी वगैरे नाही. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर तातडीने भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.  

Eknath Khadse
Ambarnath News : अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याचा प्रकार; रस्त्यात ठेवला लिंबू दोरा, नागरिकांमध्ये घबराट

रोहिणी खडसेंना त्यांचे स्वतंत्र 

भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण रोहिणी खडसे यांना देखील भाजपमध्ये येण्याचा आवाहन केलं होतं. मात्र रोहिणी खडसे यांना हे मान्य नाही. रोहिणीताई या (Sharad Pawar) शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचे लग्न झाले आहे त्यांचा संसार वेगळा आहे. शिवाय त्या शिकलेल्या आहेत अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्यावर मी फारसा काही आक्षेप घेतला नाही. असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com