Girish Mahajan News : त्यानंतरच खडसेंनी भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

Shirdi News : भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam tv

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : एकनाथ खडसे कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात भाजपचा. परंतु ते अजून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. यामुळे एकनाथ खडसे (eknath Khadse) यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे; असे मत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ब्यक्त केले.

Girish Mahajan Eknath Khadse
Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर; विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन- संवर्धनाचे काम रखडले

एकनाथ खडसे  यांचा अद्याप (BJP) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसला तरी पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला प्रवेश झाल्यासारखे असल्याचे सांगितले असल्याने आपण भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय  झालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी शिर्डी (Shirdi) येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. महाजन यांनी सांगितले की, लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. यामुळे खडसेंना घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यावरून खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची असल्याचे जाणवत आहे; असेही महाजन म्हणाले. 

Girish Mahajan Eknath Khadse
Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला. नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय. तसेच स्नेहलता कोल्हे यांच्याशी सतत संपर्क सुरु असून त्या नाराज नाहीत. देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हेंशी बोलले आहेत. चर्चेअंती सर्व नाराजी दूर झाली असून कोपरगाव मतदार संघातून चांगलं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळेल; असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला. 

Girish Mahajan Eknath Khadse
Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

ठाकरेंची चूक अक्षम्य 
स्व. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी (NCP) तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. उद्या प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उध्दव ठाकरेंनी इतकी वाईट स्थिती ओढवून घेतली. मोदीजी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उध्दव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य असून त्याचा फटका त्यांना बसणार.

संजय राऊतांना टोला 
आमच्या खिडक्या, दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. तुम्हाला लोकांनीच बाहेर हाकललयं. आज तुमचं अस्तित्व काय? या बहादरामुळे शिवसेना गेली. आमच्याबरोबर निवडून आलात आणि गद्दारी केली. मोदींच्या सभेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या. निवडून आल्यावर इतक्या वर्षांच्या संबंधांना तिलांजली दिली. आता काँग्रेससाठी मतदान मागताय. तुमची विश्वासार्हता आणि हिंदुत्व संपलं असून आता फक्त इतरांची दाढी कुरावळण्याचे काम सुरू असल्याचे महाजन यांनी संजय राऊत टोला लगावला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com