Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती व एनटी ओबीसी एसबीसी प्रवर्ग मिळून ५६ हजार विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज समाज कल्याणकडे प्राप्त झाले आहे
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: भारत सरकारच्या मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती अर्जसाठी आतापर्यंत तब्बल सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही (Student) विद्यार्थी आणि महाविद्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने समाज कल्याण विभागाने आता हात टेकले आहेत. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही (Sambhajinagar) जिल्ह्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अजूनही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. 

Sambhajinagar News
Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण (Education) केवळ आर्थिक परिस्थिती बेताची आहे.  म्हणून शिक्षण खंडित होऊ नये; यासाठी भारत सरकारकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असते. यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जातात. त्यानुसार या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती व एनटी ओबीसी एसबीसी प्रवर्ग मिळून ५६ हजार विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज समाज कल्याणकडे प्राप्त झाले आहे.

Sambhajinagar News
Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर; विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन- संवर्धनाचे काम रखडले

१५ जूनपर्यंत मुदत वाढ 

गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या सुमारे २९ हजार विद्यार्थी आणि एनटी ओबीसी एसबीसी प्रवर्गाच्या जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला होता. यंदा शैक्षणिक वर्ष संपले असताना १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. अनेकदा मुदत वाढ देऊन देखील हे अर्ज सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे यासाठी आता १५ जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com