Akola News : अकोला जिल्ह्यात वादळी तडाखा; पपई, केळीच्या फळबागा भुईसपाट

Akola News : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडसह झरी बाजार, दिवाण झरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसला आहे
Akola News
Akola NewsSaam tv

अक्षय गवळी 
अकोला
: दोन दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह वाकली पाऊस होत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. (Akola) अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने तेल्हारा तालुक्याला देखील मोठा फटका बसला असून केळी व पपईच्या बाग भुईसपाट झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) लाखोंचे नुकसान झाले आहे. 

Akola News
Ambarnath News : अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याचा प्रकार; रस्त्यात ठेवला लिंबू दोरा, नागरिकांमध्ये घबराट

अकोल्यातील तेल्हारा (Telhara) तालुक्यातील हिवरखेडसह झरी बाजार, दिवाण झरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसला आहे. यात प्रामुख्याने दरम्यान शेकडो एकरावरील पपई व केळीच्या लदबदलेल्या (Banana Crop) फळबागा जोराच्या वाऱ्यामुळे पुर्णता भुईसपाट झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. 

Akola News
Eknath Khadse News : शेवटपर्यंत राजकीय संन्यास नाही; एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

घरांचेही झाले नुकसान 

जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी अशा कित्येक फळ भाजीपाला धान्य व विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान तर दूसरीकड़ं भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे आणि विद्यमान भाजपचे अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी, काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com