Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : कारचे ऑइल गळत असल्याचे सांगत लांबविली दीड लाखाची रोकड

Jalgaon News : सायंकाळच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. यानंतर ते कारने महात्मा गांधी रोडने घरी निघाले होते.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दिवसाढवळ्या रस्ता लुटीचे अनेक प्रकार घडत आहेत. काहीतरी बहाणा करून चोरटे रस्त्यावरून पैसे लांबवत आहेत. असाच प्रकार (Jalgaon) जळगाव शहरात घडला असून कारचे ऑइल पडत असल्याचे सांगत कारमधून दीड लाखाची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे.  (Tajya Batmya)

जळगाव शहरातील महात्मा गांधी रोडवर ही घटना घडली आहे. शहरातील रामेश्वर कॉलनीतील गोपाल काशिनाथ पलोड (वय ६७) यांचे दाणाबाजारात दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. यानंतर ते कारने महात्मा गांधी रोडने घरी निघाले होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पलोड (Crime News) यांना कारमधून ऑइल पडत असल्याचे सांगितले. यामुळे पलोड यांनी कर थांबविली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालकाचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेली १ लाख ५० हजाराची रोकडची बॅग लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना लक्षात आल्यावर गोपाल पलोड यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Police) पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT