सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक १ ची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गाची (Nandurbar) दुरुस्ती करण्याच्या नावाखाली हा महामार्ग शासनाने वर्षभरापासून खोदून ठेवल्याने यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Breaking Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि शहादा (Shahada) तालुक्यांना जोळणाऱ्या या महामार्गासाठी २८ कोटींच्या दोन निविदा काढून मक्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते. मात्र शासनाकडून पैसे येत नसल्याने ठेकेदाराने देखील काम थांबवले आहे. यामुळे दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या या रस्त्यातून मार्गक्रमण करताना रोज वाहन धारक जायबंदी होत आहेत. या मार्गावर काही किरकोळ अपघात देखील रोज होत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
अशात रुग्णवाहीका, शालेय विद्यार्थ्यी, शेतकरी यांना होत असलेल्या हालबद्दल न सांगितलेच बर. त्यामुळे आता या रस्त्याबाबत स्थानिकांमध्ये रोष असून रस्ता लवकरच दुरुस्त न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.