सागर निकवाडे
महावितरण तर्फे मोठ्या वीज बिल थकबाकीदारांकडे वसुलीचा पाठपुरवठा सुरू असून मार्च अखेर मोठ्या थकबाकींकडे रक्कम वसूल व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे महावितरणाची तब्बल 1 कोटी 36 लाख 85 हजार 676 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून महावितरणकडून जिल्हा रुग्णाकडे वीज बिल थकबाकी वसुलीसाठी पाठपुरवठा सुरू आहे.
पत्र स्मरणपत्र नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु वीज बिल भरण्याबाबत जिल्हा रुग्णालयाकडून काहीही हालचाली नाहीत. अशी परिस्थिती असल्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून चार मार्चपर्यंत याबाबत काही हालचाली झाल्या नाही तर जिल्हा रुग्णालयाची वीज कोणतीही सूचना न देता खंडित करण्यात येणार असल्याचं महावितरणने स्पष्ट केला आहे.
वीज बिल न भल्यास महावितरणकडून विद्युतपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे आता 1 कोटी 36 लाख 85 हजार 676 रुपयांची थकबाकी रुग्णालयाने भरणे गरजेचं आहे. ही थकबाकी न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत केल्यावर रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. लाइट नसल्याने रुग्णांच्या उपचारात अडचणी निर्माण होऊ शकतात.
रुग्णांची गौरसोय होऊनये यासाठी महावितरणाने आतापर्यंत नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अनेक नोटीस पाठवल्या. सातत्याने नोटीस पाठवून देखील रुग्णालयाकडून पेंडींग बिलाची थोडी रक्कम देखील भरलेली नाही. तसेच ही रक्कम का भरली जात नाहीये याबाबत देखील नोटीसला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता महावितरणाने अखेर 4 मार्चपर्यंत वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.