Murbad News
Murbad NewsSaam tv

Murbad News : शरद पवार गट राष्ट्रवादीचे मुरबाडमध्ये गाजर दाखवा आंदोलन

Kalyan Murbad News : मुरबाड रेल्वे मार्गाचे ३ मार्च २०१९ ला तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
Published on

फय्याज शेख 

कल्याण : कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे भूमिपूजन होऊन पाच वर्षांचा कालावधी झाला. तरी देखील कमला सुरवात झाली नाही. यामुळे (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने मुरबाडमध्ये गाजर दाखवत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी (BJP) भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Live Marathi News)

Murbad News
Chalisgaon News : चाळीसगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा

मुरबाड रेल्वे मार्गाचे ३ मार्च २०१९ ला तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आज या भूमिपूजनाला ५ वर्षं पूर्ण झाली; तरी देखील (Kalyan) कल्याण मुरबाड रेल्वेचे काम सुरू झाले नाही. जनतेला केवळ आश्वासनाचे गाजर दाखवले गेले. प्रत्यक्षात मात्र काम झाली नाहीत. याचं कारणामुळे आज मुरबाड तीन हात नाका येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली गाजर दाखवा व चॅकलेट वाटत आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Murbad News
Jalgaon News : भादलीत महिलेने घेतला टोकाचा निर्णय; दोन्ही मुले झाली अनाथ

भाजपकडून केवळ आश्वासनांचे गाजर 

कल्याण मुरबाड रेल्वे व्हावी म्हणून मुरबाड तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षा आहे. मात्र ही अपेक्षा पुर्ण होत नाही. भाजप सरकार केवळ गाजर दाखवत असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाजर दाखावा आंदोलन केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com