Chalisgaon News : चाळीसगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा

Chalisgaon News : एका कुत्र्याने स्वतःचे पिलू मारुन टाकल्यानंतर ती पिसाळली व काही वेळातच या भागातून जाणाऱ्या येणाऱ्यांना ती चावा घेऊ लागली.
Chalisgaon News : चाळीसगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा
Published On

चाळीसगाव (जळगाव) : मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. उघड्यावर फेकले जाणारे मांस व अन्न खाल्ल्यामुळे (Chalisgaon) कुत्रे पिसाळत आहेत. अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने चाळीसगाव शहरातील करगाव रोड, वैभव कॉलनी भागात आज सुमारे २० ते २५ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. (Tajya Batmya)

Chalisgaon News : चाळीसगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा
Manoj Jarange Patil : माझ्यावर पुन्हा हल्ला घडवून आणण्याचा डाव ...; मनोज जरांगे पाटीलांचा खळबळजनक दावा


चाळीसगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी सोनार गल्ली भागात एका वृद्धाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. शहरातील वैभव कॉलनी भागात आज सकाळी सातच्या सुमारास (dog Bite) एका कुत्र्याने स्वतःचे पिलू मारुन टाकल्यानंतर ती पिसाळली व काही वेळातच या भागातून जाणाऱ्या येणाऱ्यांना ती चावा घेऊ लागली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chalisgaon News : चाळीसगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका; पोहा व कारंजा मंडळात १५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कुत्र्याला पकडायचा प्रयत्न 

काही तरुणांनी कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुंगारा देत गणेश रोडजवळील कोठावदे कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात गेली. यानंतर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावल्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीने कुत्रीला पकडले. दरम्यान, या कुत्रीने ज्यांना चावा घेतला होता, त्यापैकी काहींनी ग्रामीण रुग्णालयात तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी मोकाट कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com