Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका; पोहा व कारंजा मंडळात १५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Washim News : वाशीम जिल्ह्यातील पोहा व कारंजा मंडळ क्षेत्रात २६ फेब्रुवारीला रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार अनेक भागात वादळी (Washim) वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Farmer) त्यानुसार वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा व कारंजा या दोन महसूल मंडळात पाऊस व गारपिटीमुळे १५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  (Latest Marathi News)

Unseasonal Rain
Manoj Jarange Patil : माझ्यावर पुन्हा हल्ला घडवून आणण्याचा डाव ...; मनोज जरांगे पाटीलांचा खळबळजनक दावा

वाशीम जिल्ह्यातील पोहा व कारंजा मंडळ क्षेत्रात २६ फेब्रुवारीला रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस (Rain) व गारपीट झाली होती. या नैसर्गिक आपत्तीचा १५३९ हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका बसला. तर लहान मोठ्या तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकात गहू, हरभरा, टरबूज, संत्रा, ज्वारी व भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Accident: हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकरी संकटात 

शेतकऱ्याला नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटाचा सामना करावा लागतो. त्यानुसार आताच्या अवकाळीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर अर्थिक मदतीची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com