संदीप नागरे
दिवसेंदिवस अपघाताच्या (Accident News) घटनांचं सत्र वाढत आहे. आता असाच एक अपघात हिंगोलीमधून समोर आला आहे. हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (accident news)
हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. रंगनाथ घुगे (45 वर्ष) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी त्याच्या गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने (Hingoli News) दिली. या धडकेत रंगनाथ घुगे यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
या शेतकऱ्याचं मूळ गाव सेलसुरा आहे. रंगनाथ घुगे यांचा मृत्यू झाल्यामुळं गावावर शोककळा पसरली होती. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयानं देशभरात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं उभं केलं (Farmer Death In Accident) आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना नियमांचं पालन होत नसल्यानं रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे.
हिंगोली (Hingoli) नांदेड राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या एका शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. १ मार्च रात्री ही घटना घडली आहे. शेतकरी घुगे हे आपलं दैनंदिन कामकाज आटोपून गावाकडे जात होते. तेव्हा ही घटना घडली (latest Accident news) आहे.
राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात
यापूर्वी देखील हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या तिन्ही राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचे बळी गेले आहेत. आठ दिवसांपूर्वी हिंगोलीच्या सिरसम गावातील पाच भाविक महामार्गावरून पायी प्रवास करताना भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने मृत्यूमुखी (Accident On National Highway Hingoli) पडले होते.
दररोज अपघातांची वाढत असलेली संख्या आणि नागरिकांचे होत असलेले मृत्यू याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ( National Highway) अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.