School Bus Accident: नायगावमध्ये स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Naigaon School Bus Accident: विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घटना वसईच्या नायगाव परिसरात शुक्रवारी (१ मार्च) दुपारच्या सुमारास घडली.
Vasai Naigaon School Bus Accident
Vasai Naigaon School Bus Accident Saam TV
Published On

Vasai Naigaon School Bus Accident

विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घटना वसईच्या नायगाव परिसरात शुक्रवारी (१ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताचा थरार पाहून अनेकांना धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या दोन्ही चिमुकल्या सख्ख्या बहिणी असून त्यांचे वय अनुक्रमे २ आणि ६ वर्ष आहेत. त्या नायगाव पश्चिमेच्या (Vasai News) अमोलनगर परिसरात राहतात.

शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी एकमेकांचे हात धरून रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी वसई पश्चिम मधील सेंट ऑगस्टीन शाळेची बस मुलांना शाळेतून त्यांच्या घरी सोडायला जात होती. रस्त्यावर वळण असल्याने बसचालकाला चिमुकल्या मुली दिसल्या नाहीत. (Latest Marathi News)

काही समजण्याच्या आतच स्कूल बसने पायी जात असलेल्या दोन्ही चिमुकल्यांना धडक दिली. या धडकेत दोन्ही बहिणी बसच्या चाकाखाली आहे. आरडाओरड झाल्यानंतर चालकाने तत्काळ बस थांबवली. स्थानिकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सध्या दोन्ही बहिणींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून यातील २ वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Vasai Naigaon School Bus Accident
Mega Block News: मुंबईकरांसाठी मोठी अपडेट! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com