mega block today marathi
mega block today marathiSaam TV

Mega Block News: मुंबईकरांसाठी मोठी अपडेट! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mega Block Sunday: मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान काही लोकल उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Published on

Mega Block on Sunday Time Table

मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान काही गाड्या विलंबाने धावणार असून काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mega block today marathi
Shinde Group MLA Fights: शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधानभवनात काय घडलं? शंभुराज देसाईंनी सगळंच सांगितलं

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या CSMT-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ-माहीम अप-डाऊन धीम्या मार्गांवर रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्ग रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान CSMT येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून CSMT कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील काही धीम्या लोकल सेवा अंधेरी ते चर्चगेटदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

mega block today marathi
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, 2 मार्च 2024 तुमच्या राशीसाठी शनिवार कसा असेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com