Amravati Accident
Amravati AccidentSaam tv

Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात! भरधाव पिकअप वाहन उलटले; १५ जण जखमी

Amravati Latest News: अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकप वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published on

अमर घटारे, अमरावती|ता. २९ फेब्रुवारी २०२४

Amravati Breaking News:

अमरावतीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकप वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावतीच्या (Amravati) चांदूर बाजार तालुक्यातील अंतोरा गावचे काही रहिवासी कौंडण्यपूर येथून अस्थिविसर्जन करून परत येत होते. यावेळी तिवसा ते कुऱ्हा मार्गावर त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या मार्गावरील शेंदूरजना बाजारजवळ हे भरधाव पिकअप वाहन पलटी झाले.

या अपघातामध्ये (Accident) गाडीमधील १५ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सध्या अपघातातील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Accident
Bhusawal News : पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

मध्यप्रदेशात भीषण अपघात..

दरम्यान, मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना बुधवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. (Latest Marathi News)

Amravati Accident
Shirdi Lok Sabha: शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? काँग्रेसच्या दाव्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com