Shirdi Lok Sabha: शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? काँग्रेसच्या दाव्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली

Shirdi Lok Sabha Constituency: उद्धव ठाकरे यांनी नुकताच दौरा करुन या मतदारसंघात पुन्हा एकदा आम्हीच लढणार, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा शिर्डी लोकसभेच्या जागेवर दावा कायम ठेवला आहे.
Shirdi Lok Sabha Constituency
Shirdi Lok Sabha ConstituencySaam TV
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही शिर्डी

Mahavikas Aaghadi Loksabha Seat Sharing

महाविकास आघाडीत लोकसभेच्या ज्या जागा वाटपावरून पेच निर्माण झालेला आहे, त्यात शिर्डीचा देखील समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच दौरा करुन या मतदारसंघात पुन्हा एकदा आम्हीच लढणार, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा शिर्डी लोकसभेच्या जागेवर दावा कायम ठेवला असून इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. तेव्हापासून सलग तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने येथे विजय मिळवलेला आहे. यावेळी उध्दव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (शरद पवार) युतीत आहे. तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत.

Shirdi Lok Sabha Constituency
Breaking News: पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं; विधानभवनाबाहेर विरोधक एकवटले, सरकारविरोधात घोषणाबाजी

या बदलत्या स्थितीमुळे शिर्डीच्या जागावाटपाबाबत पेच निर्माण झाला आहे. सलग तीन वेळच्या येथील विजयामुळे ठाकरे हे कोणत्याही स्थितीत जागा सोडण्यास तयार नाहीत. लोखंडे शिंदे गटात सामील होताच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा उध्दव ठाकरे यांच्याकडे परतले असून पुन्हा उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून ते कामाला लागले आहेत.

वाकचौरे यांनी २००९ साली शिवसेनेकडून उमेदवारी करत रामदास आठवले यांचा पराभव केला होता. मात्र, २०१४ साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरे यांनी सेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सेनेने त्यांना गद्दार म्हणून संबोधत त्यांच्या विरोधात रान उठवले होते. (Latest Marathi News)

परिणामी भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि शिवसेनेकडून उमेदवारी करणारे सदाशिव लोखंडे अवघ्या तेरा दिवस प्रचार करून खासदार झाले होते. गेल्या १० वर्षात भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास करत आता पुन्हा ते उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत.

शिर्डी दौऱ्यात उध्दव ठाकरे यांनी संभाव्य उमेदवार म्हणून कुणाचेही नाव घेण्याचे टाळले असले तरी पक्षाने मला तयारी करण्यास सांगितल्याचा दावा भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. दुसरीकडे शिर्डी लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने देखील आपला दावा कायम ठेवला असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

काँग्रेसच्या राज्य महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. रूपवते या बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असून संगमनेर आणि श्रीरामपुर या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने काँग्रेस लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहे.

शिर्डीची जागा काँग्रेसला मिळाल्यास ही जागा आम्ही नक्की जिंकू असा दावा उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकेकाळी शिवसेना आणि काँग्रेस असे दोन्ही सोडल्याचा इतिहास असल्याने त्यांच्याबद्दल दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोलल जातंय.

त्यामुळे शिर्डीची शिवसेनेला मिळाल्यास ठाकरे पुन्हा वाकचौरेंना उमेदवारी देणार का?. २०१४ साली दिवंगत प्रेमानंद रूपवते यांना डावलून काँग्रेसने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली होती. आता शिर्डीची जागा काँग्रेसला मिळाल्यास प्रेमानंद रूपवते यांच्या कन्या उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी मिळणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Shirdi Lok Sabha Constituency
Cotton Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कापसाला मिळाला हंगामातील उच्चांकी भाव; किती रुपयांनी वाढले दर?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com