Nilesh Rane : पुणे मनपा नरमली, 'आर डेक्कन'ची थकित रक्कम 3 कोटी 77 लाखांची भरणा 25 लाखांचा; जाणून घ्या कारण

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेने 1900 कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल केला आहे. प्रशासनापुढं आणखी 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.
nilesh rane paid 25 lakhs pending tax of pune municipal corporation
nilesh rane paid 25 lakhs pending tax of pune municipal corporationsaam tv

- सचिन जाधव

Pune News :

पुणे महापालिकेने (pune municipal corporation) मालमत्ता कर (property tax) न भरल्याने आर डेक्कन ही भाजप नेते निलेश राणे (bjp leader nilesh rane) यांच्या संबंधितील मालमत्ता बुधवारी सील केली. सुमारे तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेने ही कारवाई केली. त्यानंतर महापालिकेच्या थकबाकीवर आक्षेप घेत थकबाकीदाराच्या प्रतिनिधीने २५ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. दरम्यान महापालिकेने हा माॅल केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा नसल्याचा चक्क लेखी खुलासा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra News)

पुणे महापालिकेने सोमवारपासून शहरात पाच पथकांच्या माध्यमातून बँड वाजवून थकबाकी वसूल करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत 1900 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनापुढं आणखी 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.

ही वसूलीची माेहिम सुरु असताना महापालिकेच्या पथकाने आर डेक्कन परिसरातील आर डेक्कन मॉलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची तीन कोटी ७७ लाख रुपये इतकी थकबाकी असल्याने तिथे बँड वाजवून ही मिळकत सील केली. .

nilesh rane paid 25 lakhs pending tax of pune municipal corporation
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

ठाकरे गटाचे बॅंड बाजा आंदाेलन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे याच्या नावाने असलेल्या या इमारतीस सील ठाेकल्याने एकच खळबळ उडाली होती. बुधवारी सायंकाळी उद्धव ठाकरे गटाने देखील आर डेक्कन इमारतीसमाेर बॅंड बाजा आंदाेलन छेडत लवकरात लवकर थकबाकी भरावी अशी मागणी केली.

पुढील आठवड्यात सुनावणी

संबंधित थकबाकीदाराच्या प्रतिनिधीने महापालिकेला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच महापालिकेने लावलेला कर हा जास्त असून त्याची चुकीच्या पद्धतीने आकारणी झाली असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे महापालिकेने त्यांची हरकत नोंदवून घेऊन त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

nilesh rane paid 25 lakhs pending tax of pune municipal corporation
NCP : अजित पवार गटाला धक्का? माढ्यातील राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लाेकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com