Washim Crime: तहसील कार्यालय परिसरात हत्येचा थरार! चाकू हल्ल्यात दस्तलेखकाचा जागीच मृत्यू; आरोपी फरार

Washim Breaking News: खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालय परिसरात घडली आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Washim Breaking News
Washim Breaking NewsSaamtv
Published On

मनोज जयस्वाल, वाशिम|ता. १ मार्च २०२४

Washim Crime News:

खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालय परिसरात घडली आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरिश्चंद्र विलास मेश्राम असे मृत्यू पावलेल्या खाजगी दस्त लेखकाचे नाव आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरिश्चंद्र विलास मेश्राम हे वाशिमच्या कारंजा तहसिल कार्यालयात दस्त लेखक म्हणून काम करतात. आज दुपारी हरिश्चंद्र मेश्राम हे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत होते. यावेळी अचानकपणे एका अज्ञात व्यक्तीने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात मेश्राम हे गंभीर जखमी झाले.

घाव वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Washim Breaking News
Kanpur IT Raid: रोल्स रॉयस, फेरारीसह तब्बल १०० कोटींच्या गाड्या; तंबाखू कंपनीच्या मालकाकडे सापडला कुबेराचा खजिना

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. तहसिल कार्यालयात भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Washim Breaking News
Nanded Youth Congress : अशाेक चव्हाण यांच्या जाण्यानंतरही काॅंग्रेसमध्ये धूसफूस, नांदेडमध्ये कार्यकर्त्यांत राडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com