Nanded Youth Congress : अशाेक चव्हाण यांच्या जाण्यानंतरही काॅंग्रेसमध्ये धूसफूस, नांदेडमध्ये कार्यकर्त्यांत राडा

Nanded Youth Congress : नांदेड शहरात आज युवक काँग्रेसची बैठक हाेती. ही बैठक नांदेडच्या काँग्रेसच्या कार्यालयात हाेती. त्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
fighting in youth congress meeting near nanded
fighting in youth congress meeting near nanded saam tv
Published On

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड जिल्ह्यातील युवक काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आज (शुक्रवारी) वादावादी झाली. काॅंग्रेसच्या नेत्यांसमाेरच वादावादी झाल्याने ज्येष्ठ नेते अशाेक चव्हाण (ashok chavan) यांनी पक्षाला रामराम ठाेकल्यानंतरही अद्याप काॅंग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे समाेर आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड शहरात आज युवक काँग्रेसची बैठक हाेती. ही बैठक नांदेडच्या काँग्रेसच्या कार्यालयात हाेती. या बैठकीपूर्वीच युवक काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला. या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. (Maharashtra News)

fighting in youth congress meeting near nanded
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

दरम्यान युवक काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेली वादावादी ही पदासाठी हाेती अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. अनेक युवक पदांसाठी इच्छुक आहेत परंतु त्यांच्यामधील रस्सीखेच ही हमरीतुमरीवर गेली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीत राडा झाल्याने त्याची चर्चा शहरात रंगली.

Edited By : Siddharth Latkar

fighting in youth congress meeting near nanded
Vinayak Raut : आंबोली ग्रामस्थांच्या पाठिशी विनायक राऊत; अनधिकृत बांधकाम पाडण्याची केली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com