Vinayak Raut : आंबोली ग्रामस्थांच्या पाठिशी विनायक राऊत; अनधिकृत बांधकाम पाडण्याची केली मागणी

अनिर्णीत वनजमिनीत हे बांधकाम करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्हा बाहेरील धनदांडग्यांनी महसूल व वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकाम केल्याची अंबाेली ग्रामस्थांनी म्हटले.
amboli villagers andolan against illegal construction
amboli villagers andolan against illegal constructionsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

आंबोली (amboli) हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले 27 बंगले वजा रिसाॅर्ट तात्काळ पाडावे ही ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडावे अन्यथा गप्प बसणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी वन (forest) आणि महसुल विभागाला (revenue department) दिला. खासदार राऊत यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रशासनाला सूचना केली. (Maharashtra News

आंबोलीत महाराष्ट्र सरकार व इतर हक्क वनखाते असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर बंगले बांधले आहेत. हे बंगले अनधिकृत असून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या आशिर्वादाने सर्व चालले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

amboli villagers andolan against illegal construction
Mumbai Crime News : मुंबईतील सराईत गुन्हेगारास अटक, अंबाेली पाेलिसांची कामगिरी

हे रिसॉर्ट बांधताना स्थानिक महसुल व वन अधिका-यांना हाताशी धरून हे बांधकाम केले असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला आहे. हे बांधकाम हटवण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. हे बांधकाम तोडण्यात येत नाही तो पर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी केली. खासदार राऊत यांनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी बोलताना हे बांधकाम म्हणजे सेकंड लवासा असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे वन आणि महसुल विभागाने योग्य ती दखल घेवून तात्काळ हे बांधकाम पाडावे, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. तसेच त्या बांधकामाला परवानगी देणाऱ्या व वीज पुरवठा करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

amboli villagers andolan against illegal construction
Nashik City Bus Service : सिटी लिंक बस सेवा आजही ठप्प, नाशिककरांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com