Mumbai Crime News : मुंबईतील सराईत गुन्हेगारास अटक, अंबाेली पाेलिसांची कामगिरी

Amboli Police Station : यासंदर्भात रोशन रुस्तम मिनी यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.
amboli police arrests one in theft cases recover valuables
amboli police arrests one in theft cases recover valuablessaam tv
Published On

- संजय गडदे

Mumbai :

जोगेश्वरी पश्चिमेकडील मलकमबाग येथील इमारतीतील घरात घुसून घरफोडी करून रोख रक्कम आणि लाखोच्या दागिन्यांची चोरी प्रकरणी अंबोली पोलिसांनी (amboli police station) एकास अटक केली आहे. फिरोज नईम अहमद कुरेशी (३९ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिरोज नईम अहमद कुरेशीने दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. तो सराईत गुन्हेगार असून मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील मलकमबाग येथील इमारत क्रमांक 14 मध्ये राहणाऱ्या रोशन रुस्तम बिनी मौर्य (७३ वर्षे) या 31 जानेवारी रोजी आपल्या पतीच्या निधनानंतर पतीचे परवानाधारक पिस्तूल पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात देण्यासाठी गेल्या.

amboli police arrests one in theft cases recover valuables
Nilesh Rane : पुणे मनपा नरमली, 'आर डेक्कन'ची थकित रक्कम 3 कोटी 77 लाखांची भरणा 25 लाखांचा; जाणून घ्या कारण

पिस्तूल देऊन पुन्हा घरी आल्यानंतर घराचा दरवाज्याचा टाळा त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसून आला व घरातील कपाट देखील तोडले असल्याचे आढळून आले. त्यांनी पाहणी केली असता घरातील रोख रक्कम आणि दागिने दिसून आले नाहीत. यासंदर्भात रोशन रुस्तम मिनी यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी (कलम - ४५४, ३८० भा. द. वी नुसार) गुन्हा दाखल केला.

amboli police arrests one in theft cases recover valuables
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीस सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पाेलिसांनी नूमद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddhath Latkar

amboli police arrests one in theft cases recover valuables
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com