Akola Crime News: संतापजनक! कुख्यात गुंड विश्वासने 4 पोलिसांवर केला चाकू हल्ला

Akola News: अकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी क्षेत्रातील एक बातमी समोर आलीये. कुख्यात गुन्हेगार विश्वास सरकटे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे.
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv
Published On

>> अक्षय गवळी

Akola Crime News:

अकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी क्षेत्रातील एक बातमी समोर आलीये. कुख्यात गुन्हेगार विश्वास सरकटे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे. विश्वासवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने याआधी अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर चाकूने वार केले होते. यात पोलीस जखमी झाले होते. कुठल्याही कारवाईवर विश्वास जुमानत नसल्याने आज त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. विश्वास सरकटे याला अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय.

विश्वासने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय गोपनारायण आणि पोलीस कर्मचारी वीर, नारायण शिंदे आणि बोबडे या चौघांवर चाकू हल्ला केला होता. विश्वास मूळ अकोला जिल्ह्यातील रामगाव येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून तो बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रहिवासी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Crime News
Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मदतीसाठी सरकार 2 हजार कोटींपेक्षा जास्त निधी करणार वितरित

विश्वास मूळ अकोला जिल्ह्यातील रामगाव येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून तो बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रहिवासी आहे.  (Latest Marathi News)

विश्वासवर दाखल असलेले गुन्हे

खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने, परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचवणे, शांतताभंग करण्याचे उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र बाळगणे इ. गुन्हे दाखल असून त्याचेवर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. मात्र त्यावर याचा काहीच परिणाम झालेला नाही.

Akola Crime News
Mankoli Bridge: माणकोली पूलाच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा! राजू पाटील संतापले; मुख्यमंत्र्यांना ट्वीट टॅग करत म्हणाले...

दरम्यान, अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता राहावी. तसेच वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईला न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. येणाऱ्या निवडणुका, तसेच आगामी काळात सन-उत्सवाचे अनुषंगाने पोलीस अशा गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com