Fraud Case
Fraud Case Saam tv

Fraud Case : नोकरी लावण्याचे आमिष देत तरुणाची ३ लाखात फसवणूक

Jalgaon News : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष शामकांत याला दाखवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने बँक खात्याद्वारे पाच लाख रुपये संशयितांना दिले
Published on

जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला नोकरी लावून देण्याचे आमिष देत तीन लाखांत फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर चाळीसगाव शहर पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Fraud Case
Dada Bhuse News : जरांगे पाटील यांनी आता आंदोलन मागे घ्यावं; दादा भुसे यांचे आवाहन

चाळीसगाव (Chalisgaon) येथील रहिवाशी शामकात युवराज भोसले (वय २७) याला जुलै २०२२ मध्ये चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवर एका जणासोबत ओळख झाली. ओळख झाल्यानंतर सदरच्या व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष (Jalgaon) शामकांत याला दाखवले.  त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने बँक खात्याद्वारे पाच लाख रुपये संशयितांना दिले. मात्र पैसे देऊन देखील नोकरी न लागल्याने समोरच्याकडे तगादा लावला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fraud Case
Lonavala News : टायगर पॉईंटवरून पडून अभियंता मुलीचा मृत्यू; लोणावळ्यात फिरायला गेली असताना घडली घटना

२ लाख मिळाले परत 

शामकांत याने सतत तगादा लावल्याने सदरील व्यक्तीने २ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरीत तीन लाख रुपये परत न करण्यास टाळाटाळ केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी संशयित संजय कामतप्रसाद राजपूत (मुंबई नाका, नाशिक) व सुशील भालचंद्र पाटील (पंचवटी, नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com