Dada Bhuse
Dada BhuseSaam tv

Dada Bhuse News : जरांगे पाटील यांनी आता आंदोलन मागे घ्यावं; दादा भुसे यांचे आवाहन

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची सभा पार पडली असून या सभेतून दादा भुसे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले
Published on

सागर निकवाडे 

नंदूरबार : मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभे केले, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि दहा टक्के आरक्षण दिलं. (Maratha Aarkshan) त्यामुळे आता आंदोलन मागं घ्यावे. स्वतः मुख्यमंत्री देखील बोलले आहेत कि आंदोलन त्यांनी मागे घ्यावे आणि या निर्णयाची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी त्यांनी सहकार्य करावे; असे आवाहन मंत्री (dada Bhuse) दादा भुसे यांनी केले आहे. (Live Marathi News)

Dada Bhuse
ATM Crime : स्टेट बँकेचे एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार; नंदुरबार शहरातील घटना 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात शिवसेनेची सभा पार पडली असून या सभेतून दादा भुसे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच महायुतीत राज ठाकरे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु दादा भुसे या विषयावर बोलण्यास टाळले असून हा सर्व विषय वरिष्ठांच्या असून त्यामुळे निर्णय वरिष्ठ घेतील; असे त्यांनी सांगितले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dada Bhuse
Buldhana News : दवाखान्यात नातेवाईकाला पाहून तरुणाने संपविले जीवन

जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्यांच्या पुर्वजांचा १९५७ पुर्वीच्या नोंदी आहेत. त्यांना ओबीसी मिळाले पाहीजे. त्याचा सरकारने आभ्यास करुन अनेकांना ओबीसी दिले. या व्यतिरीक्त ज्यांच्याकडे नोंदीच नाही; अशा गोरगरीब बांधवांसाठी न्यायालयाने फेटाळलेल्या मुद्द्यांवर अभ्यास करुन जो अहवाल सादर केला त्यानुसार १० टक्के आरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालायतील क्युरीटीअर प्रिटीशनमध्ये सर्व गोष्टींची मांडणी करुन शिक्का मोर्तब होईल. त्यामुळे याचा आनंदोत्सव साजरा केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com