Maharashtra MLA Disqualification
Maharashtra MLA DisqualificationSaam Digital

Maharashtra MLA Disqualification: टीव्ही समोर यायचं..अविर्भावात बोलायचं, २४ तास राजकारण करायचं, दादा भुसेंचा राऊतांना टोला

Maharashtra MLA Disqualification: नियम आणि कायद्यावर आम्ही काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल. आपण सेवा करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे. मात्र काही लोकं टीव्ही समोर येतात अविर्भावात बोलतात आणि 24 तास राजकारण करतात, असा टोला दादा भुसे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
Published on

Maharashtra MLA Disqualification

प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आहेत, कायद्यावर आपला देश चालतो. नियम आणि कायद्यावर आम्ही काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल. आपण सेवा करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे. मात्र काही लोकं टीव्ही समोर येतात अविर्भावात बोलतात आणि 24 तास राजकारण करतात, असा टोला दादा भुसे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

यांनी कुणाचे कधी रेशन कार्ड काढून दिले का? कोणाच्या सुखदु:खात ते कधी गेले नाहीत. शिवसेना प्रमुखांचे विचार होते त्यावर आणि संख्याबळावर आम्ही मार्गक्रमण केलं. निवडणूक आयोगाने आम्हाला निर्णय दिला आहे. माझ्या मनासारख झाले नाही की मिलिभगत आहे असं म्हणायंच. त्यांना किती खात्री आहे की ते जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत. त्यांची पण नार्कोटेस्ट केली पाहिजे, असं दादा भुसे म्हणाले असून जो निर्णय होईल तो स्वीकारावा लागतो. कायद्याच्या चौकटीत जे प्रावधान असतील ते वापरले जातील असं ते म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra MLA Disqualification
Onion Farmers Relief: कांदा उत्पादकांसाठी खूशखबर, कांद्याची भुकटी करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना पोहचवल्या आहेत. ज्या मागण्या सूचना आहेत त्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. देशाचे पंतप्रधान येतायेत ते सर्वोच्च मानबिंदू आहेत. तसेच काळाराम मंदिरात पावसाळ्यात लिकेज होते. त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 80 लाखांच्या निधीला मान्यता दिली आहे. दरम्यान त्यांनी मंत्री छगन भुजबळ नियोजन प्रक्रियेत दिसत नाहीत असं विचारलं असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलं आहे.

Maharashtra MLA Disqualification
Eknath shinde speech: मी हेलिकॉप्टरमध्ये जाऊन शेती करतो, पण हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढत नाही; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com