Shirpur News : मित्राला फोन करत संपविले जीवन; तापी नदीत मारली उडी

Shirpur News : महेश धनगर हा एका खासगी कंपनीत नोकरीस होता. २६ फेब्रुवारीला रात्री साडेआठला कोणालाही न सांगता तो घरातून निघून गेला.
Shirpur News
Shirpur NewsSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी मारत युवकाने आत्महत्या केली. सदरची घटना (Shirpur) घडल्यानंतर तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह हाती लागला. महेश श्रावण धनगर (वय २०, रा. कुरखळी, ता. शिरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. (Latest Marathi News)

Shirpur News
Murbad News : शरद पवार गट राष्ट्रवादीचे मुरबाडमध्ये गाजर दाखवा आंदोलन

महेश धनगर हा एका खासगी (Dhule) कंपनीत नोकरीस होता. २६ फेब्रुवारीला रात्री साडेआठला कोणालाही न सांगता तो घरातून निघून गेला. यानंतर त्याने मित्र अविनाश याला फोन करून मोबाईल, चार्जर व चप्पल तापी पुलावर (Tapi River) ठेवले. यानंतर नदीत उडी टाकत असल्याची माहिती दिली. यानंतर मित्राने त्याच्या घरी सांगितल्यानंतर सर्वजण पुलावर पोचले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur News
Nandurbar News : दुरुस्तीच्या नावाखाली वर्षभरापासून खोदून ठेवला महामार्ग; राज्यमार्ग १ ची बिकट अवस्था

तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

घटनेनंतर दोन दिवस शोध घेतला. मात्र मृतदेह सापडून आला नाही. ल्यानंतर २९ फेब्रुवारीला दुपारी दीडला एनएमआयएमएस संकुलाच्या शेजारी नदीपात्रात महेश धनगरचा मृतदेह तरंगताना आढळला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर (Police) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार पाटील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com