Jalgaon Accident
Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : पुलाचा कठडा तुटून विटांचा ट्रक पलटी; एका मजुराचा मृत्यू, तीन मजुर गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पुलाचा कठडा तुटल्याने विटांनी भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजुला उलटून एक मजुर ट्रक खाली दबला (Jalgaon) जावुन त्याचा मृत्यु झाला. नेरी गावाजवळ ही घटना घडली असून इतर तीन जण जखमी झाले (Accident) आहेत. या तिघा जखमींना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

श्याम कुमार तुलसीराम पाठे (वय ३४) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. म्हसावद (ता.जळगाव) येथून ट्रक १८ जानेवारीला विटा भरून छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील अजिंठा येथे जात होता. दरम्यान सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळून जात असताना रस्त्यावरील फुलाचा कठडा तुटल्याने ट्रकचे चाक फसले. त्यातच ट्रक हा कलंडला. यामध्ये श्यामकुमार तुलसीराम पाठे हा तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णालयात दाखल 

सोबत असलेले सुनील भड्या कोठोडे (वय ३३), शेख शकील शेख सलीम (वय ३२) आणि सलमान खान युसुफ खान (सर्व रा. अजिंठा जि. छत्रपती संभाजीनगर) असे तीन जण जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

Dharashiv News : आश्रम शाळा शिक्षक, कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन; भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

Mumbai VIDEO: थोड्याच वेळात मुंबईमध्ये हाय टाईड, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?

NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ३९००० रुपये मासिक वेतन; अर्ज कुठे कराल? वाचा

SCROLL FOR NEXT