जळगाव : शेअर बाजार ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुकीचे आमीष दाखवित विमा एजंटला फसविण्याचा (Jalgaon) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल ९ लाख ५४ हजार ६०० रूपयांचा गंडा घालण्यात आला असून याबाबत सायबर पोलिसात (Cyber Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Tajya Batmya)
जळगावात विमा एजंट म्हणुन कार्यरत असलेल्या राजेश प्रदीपकुमार संचेती (वय ३९) यांना १४ नाव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२३ या दरम्यान अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरच्याने भागभांडवल खरेदीच्या नावे गुंतवणुकीचे आमिष दिले. (Cyber Crime) शेअरबाजार ट्रेडींगद्वारे पैशांची गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळत असल्याच्या आमिषाला बाली पडून संचेती यांनी त्यांच्या व पत्नीच्या बँक (Bank) खात्यातून वेळोवेळी मॉगर्न कॅपिटल बूल स्टॉक्स ग्रुप २२ या वेबपोर्टलद्वारे शेअर खरेदीच्या नावाने एकुण ९ लाख ५४ हजार ६०० ऑनलाईन पध्दतीने पाठविले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
परतावा न मिळाल्याने तक्रार
मात्र बरेच दिवाण होऊन देखील गुंतवलेल्या पैशाचा मोबदला किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संचेती यांनी १० फेब्रुवारीला सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.