Electric Shock : पाण्याची मोटर लावताना विजेचा धक्का; महिलेचा मृत्यू

Jalgaon News : धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथील विजया राहुल पाटील (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे. विजय पाटील या पती एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह गावात वास्तव्यास होती.
Electric Shock
Electric ShockSaam tv

जळगाव : रात्रीच्या सुमारास गावात नळाला पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पाणी भरण्यासाठी (Jalgaon) पाण्याची इलेक्ट्रिक मोटर लावत असताना विजेचा जोरदार झटका बसला. (Electric Shock) यात विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना दोनगाव (ता. धरणगाव) येथे घडली आहे. (Tajya Batmya)

Electric Shock
Nashik Crime News: किरकोळ वादातून रिक्षाचालकानेच केला रिक्षाचालकाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात, नाशिकमधील घटना

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील दोनगाव खुर्द येथील विजया राहुल पाटील (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे. विजय पाटील या पती एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह गावात वास्तव्यास होती. विजया पाटील यांचे पती सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान १० फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास (Grampanchayat) ग्रामपंचायतीमार्फत नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात आला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास नळाचे पाणी आल्याने घरात पाणीसाठा करण्यासाठी विजया पाटील या प्रयत्न करत होत्या.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electric Shock
Buldhana Crime: महिलांशी अश्लील वर्तन; नराधमाला शिकवला चांगलाच धडा, भररस्त्यात गळ्यात चपलांचा हार टाकत बेदम चोपलं

घरात पाणी भरण्यासाठी त्या पाण्याची मोटार लावण्यासाठी गेल्या असता विजया पाटील यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्या फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीय व गावकऱ्यांनी महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com