Ahmednagar Drought: उन्हाळ्यापूर्वीच अहमदनगरमध्ये विहिरी कोरड्याठाक; हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Ahmednagar News : गावातील ७ पाझर तलाव देखील कोरडे पडले आहेत. त्यामुळे शासनाने किमान पाण्याचे टँकर तरी सुरु करावे अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
Ahmednagar Drought
Ahmednagar DroughtSaam TV
Published On

सुशील थोरात

Ahmednagar Weather Update News :

अहमदनगर (Ahmednagar) तालुक्यातील गुंडेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 9000 लोकसंख्या असलेल्या या गावांमधील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर गावातील ७ पाझर तलाव देखील कोरडे पडले आहेत. त्यामुळे शासनाने किमान पाण्याचे टँकर तरी सुरु करावे अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

Ahmednagar Drought
Ahmednagar Travel Place : रंधा धबधबा, सांधण व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर, मित्रांसोबत या पिकनिक पॉईंट्सला नक्की जा!

उन्हाळ्यापूर्वीच गुंडेगाव व आसपासच्या परिसरावर दुष्काळ परिस्थिती येऊन ठेपली आहे. शेतीच्या पिकांना तर सोडा ज्या विहिरीतून गावातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी पुरविले जाते त्या विहिरीतील पाण्याने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे येथील काही नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. तर काहीजण आसपासच्या बोरींगचे पाणी पीत आहे.

अहमदनगर तालुक्यात पाहिजे तितका पाऊस न पडल्यामुळे यावर्षी खरीपा पाठोपाठ रब्बीचे पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. बोरवेलमध्ये पाणी नाही, वहिरी आणि तलाव कोरडे पडत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आहे त्या शेत तळ्यामधील पाणी देखील पंधरा दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे प्रशासनाने किमान पिण्याच्या पाण्याचे तरी टँकर सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

नाशिक जिल्ह्याती देखील सिन्नर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. गेल्या ३० दिवसांत भूजल पातळी ३० फुटांनी घटली आहे. तालुक्यातील ३ गावं आणि ३३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हजारो नागरिकांना दुष्काळाची झळ बसत आहे. आगामी काळात भूजल पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यातून अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Ahmednagar Drought
Buldhana Crime: महिलांशी अश्लील वर्तन; नराधमाला शिकवला चांगलाच धडा, भररस्त्यात गळ्यात चपलांचा हार टाकत बेदम चोपलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com