कोमल दामुद्रे
अहमदनगर जिल्हा, भारताच्या महाराष्ट्र राज्यात वसलेला, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांचा खजिना आहे.
जर तुम्ही देखील पिकनिक पॉईंट्सला फिरण्याचा प्लान करत असाल तर या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या
अहमदनगरचा किल्ला हा सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पर्यटकांसाठी नैसर्गिक आकर्षण म्हणून ओळखले जाते.
कॅवलरी टँक म्युझियम हे लष्करी संग्रहालय म्हणून ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
सिध्देश्वर मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे मंदिर पारनेर तालुक्यातील अहमदनगर या मुख्य शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.
विशाल गणपती मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. हे गणपतीचे मंदिर १०० वर्षे जुने आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी कापूरबावडी तलाव हे सर्वात शांत पर्यटन स्थळ आहे.
भंडारदरा बसस्थानकापासून १० किमी अंतरावर असलेला रंधा धबधबा हे अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
ट्रेकर्सप्रेमींचे सगळ्यात आवडते आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ सांधण व्हॅली. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ४१०० फूट उंचीवर वसलेले आहे.