कोमल दामुद्रे
महाबळेश्वर साताऱ्या जिल्ह्यातील थंड हवेचे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.
ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला उत्कृष्ट गिरिस्थान लाभले आहे.
सातारा जिल्ह्यात वसलेलं महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचे नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
जर तुम्ही देखील फेब्रुवारी महिन्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या
महाबळेश्वरमधील ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून प्रतापगडला ओळखले जाते.
महाबळेश्वरपासून काही अंतरावर असलेले हिल स्टेशन पाचगणी. या ठिकाणी पाचगणीच्या गुंफा, कमलगड, दऱ्या, धबधबे,टेबल लँड ही पर्यटन स्थळे पाहाता येतात.
मॅप्रो गार्डन हे खवय्यांचा अड्डा म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पिझ्झा, पास्ता, सँडवीच असे अनेक चमचमीत पदार्थांची चव चाखता येते.
महाबळेश्वरमध्ये महादेवाचे मंदिर आहे. याला श्रीक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
तापोला लेक हे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तापोला लेकमध्ये पर्यटकांना बोटींगचा आनंद घेता येतो.
महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटपैकी एक प्रसिद्ध असा पॉईंट म्हणजे एलिफंट पॉईंट.या पॉईंटमध्ये असे एक दगडाचे शिल्प तयार झाले आहे जे दुरुन पाहिल्यानंतर हत्तीचे तोंड असल्यासारखे दिसते.