कोमल दामुद्रे
महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि पर्यटनस्थळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो.
सिंधुदुर्ग हे शांत आणि सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक किल्ले आणि दशावतार, चित्रकथी, पांगुळ, कीर्तन, धनगिरी नृत्यासारख्या लोककला प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्हालाही पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर सिंधुदुर्गातील या पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थित, सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रात एक बेट आहे. हे भव्य बांधकाम ४८ एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे
सावंतवाडी येथील सावंतवाडी पॅलेस. सावंतवाडीचा रॉयल पॅलेस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
पावसाळ्यातील हे सर्वात जास्त आवडते पर्यटन स्थळ आहे. आंबोली जंगलात भरपूर जैवविविधता आढळते. तसेच धबधबे हे आंबोलीतील मुख्य आकर्षण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्कुबा डायविंग हे पाण्याखाली आहे. येथे विविध प्रकारचे मासे आणि सागरी विश्व पाहाता येते.
तारकर्ली समुद्रकिनारा मालवणच्या दक्षिणेस जवळजवळ ७ किमी अंतरावर कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर आहे.