Airoli Katai flyover completion update saam tv
महाराष्ट्र

Airoli Katai flyover: नवी मुंबईतून काही मिनिटांतच कल्याण-डोंबिवलीत पोहोचता येणार; ऐरोली-काटईदरम्यानचं सर्वात मोठं काम पूर्णत्वाला...

Airoli Katai flyover completion update: नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली यांना जोडणारा ऐरोली-काटई फ्लायओव्हर जवळपास पूर्ण झाला असून लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. या फ्लायओव्हरमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गर्दी, प्रवास आणि ट्रॅफिक यामधून आता नागरिकांची सुटका होणार आहे. १ तासाच्या प्रवासाठी लागणारा २-३ तासांचा वेळ आता नागरिकांना खर्च करावा लागणार नाहीये. याचं कारण म्हणजे नुकतंच एमएमआरडीए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितलं की, बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला ऐरोली-काटई उड्डाणपूल जवळपास ८० टक्के पूर्ण झाला आहे.

या फ्लायओव्हरमुळे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीला राहणाऱ्यांना दिलासा मिळालाय. यामुळे ट्रॅफिचा प्रश्न सुटणार असून प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे. यामुळे घरी पोहोचायला देखील उशीर होणार नाहीये.

हा फ्लायओव्हर ऐरोलीतील नवी मुंबई ते डोंबिवलीतील काटई यांना जोडणार आहे. सध्या प्रवासी ज्या मार्गाने प्रवास करतायत त्या रस्त्यांना आणि महामार्गांना हा फ्लायओव्हर एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते कल्याण डोंबिवलीदरम्यानचा प्रवासासाठी लागणार वेळी बऱ्यापैकी कमी होणार आहे. त्यामुळे याचा फायदा दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार आहे. त्याचप्रमाणे कामगारांना आणि मालाची वाहतूक करणाऱ्यांना वाहनांना देखील हा फ्लायओव्हर मदत करेल.

एमएमआरडीएच्या माहितीनुसार, या प्रोजेक्टमधील बांधकामाची कामं म्हणजे खांब, गार्डर आणि डेक स्लॅब ही कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. रस्ते, रॅम्प्स, सेफ्टी बॅरियर्स, ड्रेनेज सिस्टीम यांची कामं देखील अंतिम टप्प्यात आली आहे. याशिवाय विद्युत यंत्रणा, साईनबोर्ड्स यांची कामं देखील सुरक्षितता आणि गुणवत्ता मानकांद्वारे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातायत.

या प्रोजेक्टचं काम योग्य त्या देखरेखीखाली करण्यात येतंय. यामध्ये आधुनिक बांधकामाचा वापर करत जलद गतीने काम करण्यात येतंय. या कामामुळे तिथल्या वाहतुकीमध्ये कोणते अडथळे येणार नाही याची काळजी घेण्यात येते. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, भूसंपादन आणि युटीलिटी शिफ्टींगदरम्यान ज्या अडचणी आल्यात त्यांना देखील सोडवण्यात आलंय.

एकदा का हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की ऐरोली ते काटई फ्लायओव्हरमुळे पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे आणि बेलापूर मार्ग आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवरील ट्रॅफिक कमी होणार आहे.

एमएमआरडीने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लायओव्हरचं २० टक्के काम हे ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, हे प्रोजेक्ट सरकारच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यास मदत करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT